ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाचं हे चिन्ह संकटात सापडले आहे.

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

‘धनुष्यबाण’ पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नावं गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवे चिन्ह दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नवं नाव तर धगधगती मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना बहाल केले होते. मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाचं हे चिन्ह संकटात सापडले आहे.

मशाल चिन्ह हे बिहारमधील समता पार्टीचं आहे. त्यामुळे हा पक्ष निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याची माहिती आहे. पण ठाकरे गटाची मशाल आणि बिहारमधील समता पार्टीच्या मशालीत थोडा फरक आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल गोल आकारात आणि भगव्या रंगात आहे, तर समता पार्टीची मशाल दोन रंगात आहे. त्या मशालीवर दोन हिरवे आडवे पट्टे आहेत त्यात मध्यभागी पांढरा पट्टा, त्यावर धगधगती मशाल आहे.

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. देवळेकर यांनी यापूर्वीसुद्धा ईमेलद्वारे मशाल या चिन्हावर हक्क सांगितला होता. देवळेकर यांच्या मते, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवेळी या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. या दोन चिन्हांमुळे मतविभागणी होऊ शकते. त्यामुळे मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

दरम्यान, १९९४ साली समता पार्टी पक्षाची स्थापना दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती. त्यानंतर १९९६ साली आयोगने समता पार्टीला मशाल चिन्ह देण्यात आले होते. मात्र २००४ मध्ये या पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली. तरीही समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.

Exit mobile version