“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”

शेकापचे जयंत पाटील यांनी साधला निशाणा

“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”

महाराष्ट्रात शुक्रवारी विधान परिषद निवडणुक पार पडून निकालही जाहीर झाले. राज्यात ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे मत फुटीची शक्यता होती. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. तर, महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. मविआकडून ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडून आल्या. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला पण, पराभव हा पराभव आहे त्यामुळे आत्मचिंतन करत आहे. विजय झाला तरी आत्मचिंतन करतो आणि पराभूत झालो तरी आत्मचिंतन करतो. हरलो असलो, तरी पुन्हा लढू. महाराष्ट्रात याआधी अशा पद्धतीच राजकारण नव्हतं. थोड्या प्रमाणात इकडे तिकडे लोक करायचे. आजपर्यंत ज्या निवडणुका मी लढवल्या, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती,” असं म्हणत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

स्पष्टच झालं…मविआमध्ये सगळं आलबेल नाही!

पिस्तुल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल

गरजेच्या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मदत केली नाही असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील म्हणाले की, “मी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) १२ मतांवर उभा होतो. एक मत त्यांचे फुटले. आमची पण मतं फुटली. मला चार मत मिळाली असती, तर सेकंड प्रेफरन्सची २५ ते ३० मते घेऊन निवडून आलो असतो. गणित तसेच होते. काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली पाहिजे होती, तर निकाल बरोबर लागला असता. पण, त्यांनी ठाकरे गटाला प्राधान्य दिलं,” असं जयंत पाटील म्हणाले. अप्रत्यक्षपणे त्यांनी कमी मत मिळाल्याचा ठपका काँग्रेसवर ठेवला असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक निकालानंतरही आपण शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version