‘शिवसेना कुणाची’ याची सुनावणी ३ ऑगस्टला

‘शिवसेना कुणाची’ याची सुनावणी ३ ऑगस्टला

शिवसेनेच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलली

शिवसेना पक्षावर कोणाचा दावा आहे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटीसला स्थगिती देण्यात यावी, अशी उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलली असून ३ ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला. यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील पत्र पाठवले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी शिवसेना आमचीच असल्याचे म्हटले होते. दोन्ही बाजूंना ८ ऑगस्ट पर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला होत. परंतु निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

…ईडीचे अधिकारी घरी आले की सोबत घेऊनच जातात!

मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आता ३ ऑगस्टला होणार आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल झालं आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ३ ऑगस्ट रोजी निश्चित करणार आहेत. सोबतच निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का हे देखील याच दिवशी समजणार आहे.

Exit mobile version