नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

सत्तेतून पायउतार होताना ठाकरे सरकारने एकामागून एक नामांतराचे निर्णय घेतले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारने घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळातील निर्णयांना स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. यामध्ये औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, अहमदनगर येथे दिवाणी न्यायालय, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता, विदर्भ विकास मंडळ, वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना हक्काची घरे देणे, यासह अनेक निर्णय ठाकरे सरकारने एकाच दिवशी घेतले होते.

हे ही वाचा:

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

‘द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील’

मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयांवर आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत, असा आक्षेप फडणवीसांनी घेतला. त्यानुसार गुरुवार, १४ जुलै रोजी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा या निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

Exit mobile version