राणा दांपत्य दिल्लीत दाखल
राणा दाम्पत्य सोमवार, ९ मे रोजी दिल्लीत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य हनुमान पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यांनतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान, राणा दाम्पत्यांसोबत जे अत्याचार झाले या घटनेची सर्व माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीत दाखल झाले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रवी राणा म्हणाले, ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काम करत होते, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी असा घणाघात त्यांनी केला आहे.
तर नवनीत राणा जेव्हा लीलावतीमध्ये ऍडमिट होत्या त्यांच्यावर जे उपचार झाले त्याचे शिवसेना रिपोर्ट मागत आहे. त्यावर नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे ऑपरेशन झाले म्हणून दोन वर्ष मुख्यमंत्री कार्यालयात आले नव्हते. त्यांचे रिपोर्ट आम्ही कधी मागतीले नाहीत. मात्र त्यांना आता माझ्या आजाराचे रिपोर्ट्स बघायचे आहेत तर आधी उद्धव ठाकरेंनी त्यांचे रिपोर्ट्स द्यावेत मग मी माझे रिपोर्ट्स दाखवते, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या, तुरुंगात असताना माझ्यावर जे अत्याचार झाले. वीस फूट खड्यात आम्हाला गाडणार असं संजय राऊत म्हणाले. त्यांनतर तुरुंगात असताना माझ्यावर प्रशासनाने जे काही अत्याचार केले. प्रशासन दबावाखाली काम करत आहे, याची सर्व माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करणार आहे. कारण महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही म्हणून दिल्लीला आलो आहोत असही नवनीत राणा म्हणाल्या.
हे ही वाचा:
मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये
NIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक
दरम्यान, आज संध्याकाळी ५.३० वाजता राणा दाम्पत्य लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच इतर बड्या नेत्यांची देखील ते भेट घेणार आहेत.