‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न

‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधतात. या रविवारी पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तसेच काही प्रश्नही जनतेला त्यांनी विचारले. ‘मन की बात’ चा हा ८८ वा भाग होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी नुकत्याच सुरू झालेल्या पंतप्रधान संग्रहालयाचीही माहिती दिली आहे. हे संग्रहालय देशातील जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून पंतप्रधानांचे योगदान आणि जनतेला त्यांच्याशी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी सार्थकचा उल्लेख केला आहे. सार्थक याने संग्रहालय पाहून आल्यानंतर नमो ऍपवर त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. सार्थकने ऍपवर लिहिले आहे की, तो वर्षानुवर्षे न्यूज चॅनेल पाहतो, वर्तमानपत्र वाचतो, सोशल मीडियाशीही जोडलेला असतो, त्यामुळे त्याचे सामान्य ज्ञान खूप चांगले असल्याचे त्याला वाटायचे. पण जेव्हा त्याने पंतप्रधान संग्रहालयाला भेट दिल्यानंतर त्याला नवीन गोष्टींची माहिती मिळाली. आपल्या देशाबद्दल आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही हे त्याच्या लक्षात आले, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

तसेच पंतप्रधान मोदींनी कॅशलेस पेमेंटचे महत्व सांगितले. कॅशलेस पेमेंटचे महत्व सांगताना पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील दोन बहिणींचे उदाहरण दिले. सागरिका आणि प्रेक्षा या दोघी बहिणी फक्त कॅशलेस पेमेंट करतात त्यात त्यांना काही अडचण येत नाही असे पंतप्रधान यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘याआधी झुंडशाही राज्यात कधी पहिली नव्हती’

राणा दाम्पत्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल

‘माझा दुसरा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न’

‘मन की बात’ मधून यावेळी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी आणि जनतेला सात प्रश्न विचारले. तसेच, कोणत्याही विद्यार्थी किंवा  तरुणांना पंतप्रधान मोदींच्या या प्रश्नांची उत्तरे द्यायचे असतील तर, ते लोक #MuseumQuiz वापरून सोशल मीडिया आणि नमो ऍपवर प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.

१. कोणत्या शहरात रेल्वे संग्रहालय आहे? ४५ वर्षांपासून भारतीय रेल्वेचा हा वारसा लोक पाहत आहेत.
२. मुंबईत कोणते संग्रहालय आहे जेथे चलनाचा (चलन) विकास पाहिला जातो? सहाव्या शतकातील नाण्यांसोबत ई-मनीही येथे आहे.
३. विरासत-ए-खालसा हे कोणत्या संग्रहालयाशी संबंधित आहे आणि ते पंजाबमधील कोणत्या शहरात आहे?
४. देशातील एकमेव पतंग संग्रहालय कोठे आहे?
५. भारताच्या टपाल तिकिटाशी संबंधित राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?
६. गुलशन महल नावाच्या इमारतीमध्ये कोणते संग्रहालय आहे? या म्युझियममध्ये तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शकही होऊ शकता.
७. कोणते संग्रहालय भारताचा वस्त्रोद्योग वारसा साजरा करते? हे सात प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारले आहेत.

Exit mobile version