काँग्रेस राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आणि इतर ठिकाणांहून तब्बल ३५१ कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. साहू यांच्या घरासह मालमत्तांवर तब्बल सात दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. साहू यांच्या मालमत्तांवरील धाडीला इतिहासातील सर्वात मोठी धाड असल्याचं बोललं जात आहे. धीरज साहूंच्या घरातून जप्त केलेली रोकड एवढी होती की, रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटांची बंडलं मोजण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली. शिवाय नोटा मोजताना मशीनही थकल्या आणि बंद पडल्या.
धीरज साहूंच्या घरातून ३५१ कोटींची रोकड जमा करण्यात आली. सध्या या धाडीची देशभरात चर्चा आहे. अशातच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धीरज साहुंच्या घरात आणखी रोकड लपवून ठेवलेली असल्याचा संशय आहे. त्यामुळे धीरज साहू यांच्या घराती आणि कार्यालयांची पुन्हा झडती आयकर विभाग घेणार आहे. यासाठी आयकर विभाग अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे. धीरज साहूंच्या घराच्या भिंती आणि आसपासचा परिसर, कार्यालय आणि इतर ठिकाणांची आयकर विभाग जिओ सर्व्हिलन्स सिस्टिमद्वारे झडती घेणार आहे.
आयकर विभागाच्या सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, साहू यांनी केवळ आपल्या घरात आणि कार्यालयातच नव्हे तर त्यांच्या आलिशान घराच्या भिंतींमध्येही नोटा आणि इतर मौल्यवान वस्तू दडवून ठेवल्या आहेत. याचाच तपास करण्यासाठी आता आयकर विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहेत. त्यांच्या घराच्या भिंती आणि मैदान, ऑफिस आणि इतर ठिकाणांवरही जिओ सर्व्हिलन्स सिस्टीमद्वारे नजर ठेवली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा:
महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
धीरज साहू यांच्या घरातून आणि कंपनीतून तब्बल ३५१ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी ३०० कोटी रुपये एकट्या बालनगीरच्या दारू कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले आहेत. साहू कुटुंबाच्या दारू व्यवसायाबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे वर्षानुवर्ष तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.