मविआच्या मोर्चाला पोलिसांची अद्याप परवानगी नाही

अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली

मविआच्या मोर्चाला पोलिसांची अद्याप परवानगी नाही

येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीकडून मुंबईत हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली नाही आहे. पण महाविकास आघाडी मोर्चावर ठाम असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.

गुरुवार, १५ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. येत्या १७ डिसेंबरला मविआकडून मुंबईत हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांकडून अजून परवानगी देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी मोर्चावर ठाम असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे. परवानगी हा मोठा विषय नसून, परवानगी मिळेल आणि हल्लाबोल मोर्चा निघेल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, सगळ्या नागरिकांना आम्हाला आवाहन करायचं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात जो कारभार चालला आहे. हा कारभार सरकार म्हणून चाललेला असताना महापुरुषांच्या बाबतीत, बेताल वक्तव्य, अपशब्द वापरण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम हे काही थांबायला तयार नाही. त्यासाठी आम्ही १७ तारखेला मोर्चा काढत आहोत.

हे ही वाचा:

‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’

माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

तर मागे आम्ही पत्रकार परिषद घेतली होतीच. आता परवा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राज्यातील आज सगळे प्रमुख पक्ष, आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या. मोर्चाच्या नियोजनाबद्दल चर्चा झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Exit mobile version