“अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फडणवीसांसोबतच्या फोटोला अर्थ नाही”

अनिल देशमुखांच्या आरोपांवर समित कदम यांचा खुलासा

“अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फडणवीसांसोबतच्या फोटोला अर्थ नाही”

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले असून काही ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिल्याचा दावा केला आहे. समित कदम या व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी निरोप पाठवला होता, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याचे स्वतः समित कदम यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख यांनी दाखवलेल्या फोटोंवर समित कदम म्हणाले की, “अनिल देशमुख यांनी दाखवलेल्या फोटोंमध्ये काहीही अर्थ वाटत नाही. अनिल देशमुख सारखे एकच फोटो दाखवत आहेत. अनिल देशमुखांनी माझे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर हे फोटो आहेत. तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही. माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर आहेत. अनेक वर्तमानपत्रात आलेले आहेत,” असा दावा समित कदम यांनी केला आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, “मी एका पक्षाचा राज्य अध्यक्ष आहे. मला अनेक राजकीय नेते ओळखतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेते बैठकीसाठी बोलवतात. अशाच प्रकारे एका बैठकीसाठी अनिल देशमुखांनी मला बोलवलं होतं. २०१६ पासून ‘जन सुराज्य शक्ती’ हा स्वतंत्र पक्ष असून मी त्याचा राज्य अध्यक्ष आहे. आम्ही एनडीएचे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात फडणवीसांची भेट होते. त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांचीही भेट होते. त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं होतं,” असं समित कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा :

भारतीय युद्धनौका रशियन परेडमध्ये सामील, पुतीन यांनी मानले आभार !

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील

मुंबईत पुन्हा हिट अँड रन प्रकरण; बीएमडब्लूच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अनिल देशमुख यांच्यासोबतही बैठक झाल्याचे समित कदम म्हणाले. “बैठकीत एकमेकांशी चर्चा केली. त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघतो. तू दिल्लीला अमित शाहांना भेटता, त्यांच्याशी तुमचे संबंध आहेत. राज्याच्या अनेक बैठकीत तुम्ही असता. फडणवीस आणि इतर नेत्यांसोबतही तुम्ही दिसता. त्यामुळे मला तुमच्याशी संवाद करुन काही मदत होण्यासारखं असेल तर करायची आहे, याबद्दल आमची भेट झाली होती”, असा दावा समित कदम यांनी केला आहे.

Exit mobile version