शिवसेना आणि बंडखोर आमदारांचा शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेत शिंदे गटाने ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे.
याचिकेत म्हटलं आहे की, ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. यासोबतच संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य
अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब
“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”
“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”
शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना नोटीस बजावण्यात आली असून, सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचं आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. तसंच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली आहे.