राहुल गांधींच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात निवेदन दिले आहे. तुम्ही जर का आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल तर, या देशातील जनता आणि आम्हीसुद्धा ते सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सदनातील मानसन्मान सगळ्यांनी राखलाच पाहिजे, बोलतांना तारतम्य बाळगले पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अंत्यविधी झाल्यावर लगेच ते कर्तव्यावर हजर झाले. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, त्यांच्या नसानसात भिनली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्यांचे काय? असा प्रश्न सुद्धा त्यांनी या वेळेस विचारला कारवाई करायची असेल तर सर्वावर ती कारवाई झाली पाहिजे असे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले.
राहूल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले तेव्हा आम्ही त्याचे समर्थन केले नाही. पण जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असे बोलणे हे देशद्रोहाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही या देशाचा मान आणि देशाची कीर्ती पोचवण्याचे काम पंतप्रधान करतात करतात असे मुख्यमंत्री म्हणले. लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा कशी काढली? जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळेस काँग्रेसला विचारले आहेत. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांचासुद्धा आम्ही अभिमान आम्ही बाळगतो. असे एकनाथ शिंदे यावेळेस म्हणाले.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केले. यावरूनच आता देशभरात भाजपतर्फे राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. लंडन मध्ये राहुल गांधी यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही नष्ट करायचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला आहे. या वक्त्यावरून संसदेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक होऊन राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने आता लावून धरली आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा एक फोटो ट्विट करत माफी मागायला सावरकर समजलात का? असे ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे.