तुरुंगातून केजरीवालांनी दिलेला आदेश चौकशीच्या फेऱ्यात

जलखाते मंत्री अतिशी यांची होणार चौकशी

तुरुंगातून केजरीवालांनी दिलेला आदेश चौकशीच्या फेऱ्यात

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. अटकेनंतरही अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. तरुंगातूनच आपण सरकार चालवणार असल्याचे केजारीवाल आणि त्यांच्या पक्षाने जाहीर केले आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीतून कारभार हाकताना ईडी कोठडीमधूनच पहिली ऑर्डर देखील पास केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केजरीवाल यांनी काढलेली ही ऑर्डर ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

वकिलामार्फत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुपूर्द केलेल्या लेखी चिठ्ठीमध्ये केजरीवाल यांनी जलखाते असलेल्या मंत्री अतिशी यांना शहरातील काही भागातील पाणी आणि गटारसंबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, कोठडीतून देण्यात आलेल्या या पहिल्या ऑर्डरसंबंधी ईडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या ऑर्डरबद्दल ईडीने सांगितले की, आम आदमी पक्षाने केलेल्या दाव्याची चौकशी केली जाईल. कोठडीत असलेल्यांना स्टेशनरी वापरण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही ऑर्डर कशी काढण्यात आली. ती कथित ऑर्डर कोण घेऊन आले आणि ती कोणी आणि केव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवली याबद्दल मंत्री अतिशी यांची चौकशी केली जाईल. तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे यासंबंधीच्या दाव्याची पडताळणी केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :

चांद्रयान ३ची लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ नावानेच ओळखली जाणार!

बांगलादेशी मुस्लिमांना आधी भारतीय व्हावे लागेल तरच…

केजरीवालांच्या अटके विरोधात इंडी आघाडीचा ‘आक्रोश’!

अमरावती: २० हुन अधिक प्रवाशांसह एसटी बस दरीत कोसळली!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर तोडगा काढावा, असे आदेश पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांना दिले आहेत. यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करत, केजरीवाल यांना अटक झाली असली तरी दिल्लीकरांचे कोणतेही काम अडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. हा आदेश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, असेही त्या म्हणाल्या. अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी त्यांच्या निवास्थानातून अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविले आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी तुरुंगातून मुख्यमंत्री म्हणून पहिला आदेश जारी केला होता.

Exit mobile version