अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धडपडत आहेत, असा आरोप भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकरांनी ट्विट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असल्याचा आरोपही केला आहे.
“मेट्रो घडवणारे मा. देवेंद्र फडणवीस राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटन करत फिरतायत.” असे ट्विट भातखळकरांनी केले. हा प्रकल्प रखडवल्याबद्दल खरे तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. पण ते कोरोनाच्या काळात न केलेल्या कामाची जाहिरातबाजी करत आहेत. मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी खेळखंडोबा केला आहे, त्यामुळे त्यांना या ट्रायल रनचे उद्घाटन कऱण्याचा नैतिक अधिकार नाही. असं भातखळकर म्हणाले.
मेट्रो घडवणारे मा.@Dev_Fadnavis राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT उद्घाटन करत फिरतायत. #ThanksFadanvis4Metro pic.twitter.com/h5sbE9qrfZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 31, 2021
यात श्रेयाचा मुद्दा नाही. श्रेय तुम्ही घ्या पण मुंबईकरांची मेट्रो होऊ द्या. अहंकारापायी आरे शेडमधील काम थांबवू नका, असेच आमचे म्हणणे होते. त्यामुळे श्रेयाचा मुद्दा महत्त्वाचा नाही. मेट्रोचा खेळखंडोबा करू नका, असेच आमचे म्हणणे आहे. असंही भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं
तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६ टक्क्यांची घट
दुबईत 17 सप्टेंबरपासून आयपीएल सुरु?
पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?
मुंबईत आज मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु झाली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवला आहे.