दिल्लीमध्ये भाजप पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे.भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढील १०० दिवस नव्या जोशात, नव्या उत्साहाने, नव्या जोशात आणि नव्या ऊर्जेने काम करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, आपल्याला प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज आणि प्रत्येक पंथावर विश्वास ठेवायला हवा. पुढील शंभर दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला प्रत्येकाचा विश्वास जिंकायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, एनडीएला ४०० च्या पुढे न्यायचे असेल तर भाजपला ३७० चा टप्पा पार करावा लागेल. जेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न कराल तेव्हाच देशाच्या सेवेसाठी भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील.पंतप्रधान मोदींनी जैन संत आचार्य विद्यासागर यांना आदरांजली वाहिली.आचार्य विद्यासागर यांचे रविवारी (१८ फेब्रुवारी) निधन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी आजच्या या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी अमित शाह यांनी घराणेशाहीवरुन विरोधी पक्षावर जोरदार टीका केली होती.भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.
देशाची स्वप्ने आणि संकल्पही मोठी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने आज प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली आहे, त्यामुळे प्रत्येक देशवासीय मोठ्या संकल्पाने एकत्र आले आहेत. हा ठराव विकसित भारताचा आहे. आता देश ना छोटी स्वप्ने पाहू शकतो ना छोटे संकल्प करू शकतो. स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. भारताचा विकास करायचा हे आमचे स्वप्न आणि संकल्प आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
छत्रपती शिवरायांना मानणारी लोकं आम्ही
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात राम मंदिराचाही उल्लेख केला.ते म्हणाले की, आमच्या सरकारने ५ शतकांची प्रतीक्षा संपवली.ते पुढे म्हणाले की, मी माझ्या आनंदासाठी आणि वैभवासाठी जगणारा व्यक्ती नाहीये.मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही.मी माझ्या देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेला व्यक्ती आहे.’आम्ही छत्रपती शिवाजींना मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते म्हणाले नव्हते की, चाल आता सत्ता मिळाली तर उपभोग (आनंद) घेऊया. त्यांनी आपले ध्येय चालू ठेवले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘७ दशकांनंतर कलम ३७० पासून स्वातंत्र्य’
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना प्रोत्साहन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘शतकांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचे धाडस आम्ही दाखवले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून आपण ५ शतकांची प्रतीक्षा संपवली. गुजरातमधील पावागडमध्ये ५०० वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. ७ दशकांनंतर आम्ही करतारपूर साहिब महामार्ग खुला केला. ७ दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम ३७० मधून स्वातंत्र्य मिळाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
हेही वाचा..
हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर
कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…
अमरावतीत टेम्पो ट्रॅव्हल अपघातात चार क्रिकेटपटूंचा मृत्यू!
कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता
विरोधकांच्या तोंडूनही ४०० पार च्या घोषणा
भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज विरोधी पक्षाचे नेतेही, ‘एनडीए सरकार ४०० पार करेल’ अशी घोषणा देत आहेत.एनडीएला ४०० च्या पुढे न्यायचे असेल तर भाजपला ३७० चा टप्पा पार करावा लागेल.भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवस २४ तास देशाची सेवा करण्यासाठी काही ना काही करत राहतात, पण आता पुढचे १०० दिवस नवीन उर्जा, नवा उत्साह, नवा उत्साह, नवा आत्मविश्वास आणि नव्या उमेदीने काम करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तरुणांवर लक्ष केंद्रित करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तरुणांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, आज १८ फेब्रुवारी आहे, या काळात जे १८ वर्षांचे झालेले तरुण आहेत ते देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी मतदान करणार आहेत.पुढील १०० दिवस आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे.प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहचायचे आहे.आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. जेव्हा सर्व जण प्रयत्न करू तेव्हा देशाच्या सेवेसाठी भाजपाला अधिक जागा मिळतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
घराणेशाहीने देशाचे कल्याण होत नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला संबोधित केले.यावेळी अमित शाह घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचावर तोफ डागली.ते म्हणाले की, शरद पवार यांचं लक्ष्य ते म्हणजे कन्येला मुख्यमंत्री बनवणे, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवेन हे सोनिया गांधी यांचे लक्ष आहे.तसेच लालूप्रसाद यादव यांचं आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे हे लक्ष आहे.परंतु, घराणेशाहीने देशाचे कल्याण होत नाही, असे अमित शाह म्हणाले.