24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणअनिल देशमुखांना दिलासा नाही; सुनावणी ४ ऑक्टोबरला

अनिल देशमुखांना दिलासा नाही; सुनावणी ४ ऑक्टोबरला

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अद्याप उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या देशमुख यांच्या याचिकेवर आता ४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ईडीकडून अनिल देशमुखांना पाच नोटिसा पाठवल्या असूनही अटक होईल या भीतीने देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी जात नाहीत.

बुधवारी उच्च न्यायालयात देशमुख यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, सॉलिसिटर जनरलला या प्रकरणी ईडीची बाजू मांडायची आहे. त्यानंतर खंडपीठाने सुनावणी स्थगित केली. आता या याचिकेवर पुढील सुनावणी ही ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

हे ही वाचा:

मीरा- भाईंदर पालिका अधिकारी दीपक खंबित यांच्या गाडीवर गोळीबार

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

कोण आहेत फुमियो किशिदा?

आतापर्यंत ईडीने अनिल देशमुखांना पाच वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत, परंतु ते आतापर्यंत ईडीसमोर हजर झालेले नाहीत. ते ईडीसमोर प्रत्यक्षात जाणे टाळत असून ऑनलाइन हजर होण्यास तयार आहेत. यापूर्वी ईडीने या प्रकरणात त्यांच्या खासगी सचिवांना अटक केली होती. दोघेही सध्या तुरुंगात आहेत. तपासादरम्यान, ईडीला देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक पुरावे सापडले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा