मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

नांदेडमधील किनवट मतदारसंघातील सभेत देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा धुराळा उडाला असून सभांना जोर आला आहे. नांदेडच्या किनवट मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. तसेच पाणी प्रश्नावर तोडगा निघून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार असल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अडीच वर्षात एक रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. आपलं सरकार आल्यानंतर हजारो कोटी रुपयांचे काम भीमराव केराम यांनी केले. आता चिंता करायचं काम नाही, सरकार आपलच येणार आहे. उच्च पातळी बंधार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. निम्न पैनगंगा धरण केलं तर ९५ गावे बुडणार आहेत आणि म्हणून तो निर्णय मी बदलला. या ९५ गावांना मी विस्थापित होऊ देणार नाही,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाडा भागाची कायम दुष्काळी भाग म्हणून नोंद झाली आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. ५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आलं तर पाणी प्रश्न मिटेल आणि ते काम आम्ही सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की, चिंता करू नका. लागेल तो पैसा देऊ. मराठवाड्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

जेट एअरवेजची मालमत्ता विकणार, कर्मचाऱ्यांना मिळणार का हिस्सा?

‘मशिदींवरील भोंगे बेकायदेशीर, हिंदूंना जो कायदा तोच मुस्लीमांनाही’

‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’

‘जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी, कलम ३७० चे बॅनर भाजपाने फाडले’

मुलीच्या जन्माचे स्वागत झालं पाहिजे म्हणून ‘लेक लाडकी योजना’ आणली. अर्ध्या तिकिटात महिलांसाठी प्रवास सुरू केल्याने तोट्यात असलेली एसटी नफ्यात आली. मुलींसाठी शिक्षण मोफत केलं. जेव्हा ‘लाडकी बहीण योजना’ आणली तेव्हा सावत्र भाऊ न्यायालयात गेले पण न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. महाविकास आघाडीचे लोक निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार. शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे सारखे तसेच म्हणत आहेत. पण ही योजना सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Exit mobile version