मुस्लीम समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टाईम्स नाऊ’ने घेतलेल्या मुलाखतीत केले. मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मुस्लीम समाजातील लोकांना आवाहन करत म्हटलं की, काँग्रेसच्या काळात सरकारी योजनांचा लाभ तुम्हा लोकांना का मिळाला नाही, याचे तुम्ही आत्मपरीक्षण करा.
नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी या विषयावर यापूर्वी कधीच बोललेलो नाही. पण, मुस्लीम समाजाला सांगत आहे. त्यांच्या समाजातील सुशिक्षित लोकांनी आत्मपरीक्षण करायला हवे. विचार करा, देश एवढा प्रगती करत आहे, जर आपल्या समाजात कमतरता जाणवत असेल तर त्याची कारणे काय आहेत? काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी व्यवस्थेचा लाभ का मिळाला नाही? काँग्रेसच्या काळात तुम्ही या दुर्दशेला बळी पडलात का? एकदा आत्मपरीक्षण करा आणि नंतर निर्णय घ्या. तुम्हाला सत्तेत बसवू, आम्ही तुम्हाला काढून टाकू, असे मनात असेल तरी तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहात,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर मुस्लीम समाज कसा बदलत आहे यावर देखील भाष्य केलं. “जगात मुस्लीम समाज बदलत आहे, मी आखाती देशांमध्ये जातो. मला वैयक्तिकरित्या खूप आदर मिळतो आणि भारतालाही मिळतो. पण इथे विरोध करतात. सौदी अरेबियात योग हा अधिकृत अभ्यासक्रमाचा विषय आहे. मी इथे योगाबद्दल बोललो तर तुम्ही म्हणाल ते मुस्लिमविरोधी आहे,” अशी टीका करत नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल दाखवून दिले.
“आखाती देशांमध्ये जातो तेव्हा श्रीमंत लोक माझ्यासोबत बसायचे, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते मला योगाबद्दल नक्कीच विचारतात. अधिकृत प्रशिक्षण घ्यायचे असेल तर काय करावे, कसे करावे असे अनेक प्रश्न ते विचारतात. कोणी सांगतं की, त्यांची पत्नी योग शिकायला भारतात जाते. ती तिथे महिनोनमहिने राहते,” असा अनुभव नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितला. पण, भारतात योगला हिंदू मुसलमान बनवून टाकले आहे.
हे ही वाचा:
पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!
सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड
कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!
‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’
“मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की, किमान त्यांनी त्यांच्या मुलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करा. कोणत्याही समाजाने कामगारासारखे जगावे अशी माझी इच्छा नाही. तुम्हाला कोणीतरी घाबरवत आहे म्हणून असं जगायचं. भाजपाचे लोक तुम्हाला घाबरवतील असं सांगतात. पण मी म्हणेन जा, ५० लोकांनी एक दिवस भाजपा कार्यालयात बसून बघा. तुम्हाला ते हाकलून देतात का ते बघा. कोण कशाला तुम्हाला हाकलवेल?” असं नरेंद्र मोदी म्हणाले.