30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणपाटण्यामधील बैठक ही 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' बैठक

पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सणसणीत टोला

Google News Follow

Related

बिहारच्या पाटणा शहरात भारतीय जनता पक्षाविरोधात सर्व भक्कम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून विरोधक एकत्र आले आहेत. देशभरातील सुमारे १५ पक्षांचे नेते या बैठकीला गेले आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला विरोधकांनी जरी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते लोक एकत्र आले आहेत. त्यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे. परंतु नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“२०१९ ला सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन पाहिलं. परंतु, जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त ताकदीने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहील. विरोधकांनी असे कितीही मेळावे घेतले तरीदेखील त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“सातत्याने महबुबा मुफ्तीच्या नावाने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता स्वतः महबुबा मुफ्तींसोबत त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी आपली परिवारवादी पार्टी वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करण्यासठी ते तयार आहेत,” अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हे ही वाचा:

‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक

गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी

पाकिस्तानने पेरलेले दोन डॉक्टर अखेर बडतर्फ; काश्मिरात दोन महिलांचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला

या बैठकीची धुरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे होती. अलीकडेच नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. या बैठकीला देशभरातले बडे नेते उपस्थित होते. या बैठकीसाठी आरजेडी, काँग्रेस, जेडीयू, टीएमसी, आम आदमी पार्टीसह इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा