महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला

महायुतीचे नेते विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद उपसभापतींची भेट घेणार

महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला

राज्यात सध्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार आहे. सध्या समित्या वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये समिती वाटपाचा प्रश्न ऐरणीवर असताना या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दरम्यान भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये ५०, २५, २५ अशा प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा आणि विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती समोर आली आहे.

महायुती समन्वय समितीची बैठक पार पडणार असून या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीची समन्वय समिती मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता पत्र देणार आहे. तर , विधानसभा आणि विधानपरिषदेच्या एकूण २८ समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापतींची भेट महायुतीचे नेते घेणार आहेत.

विशेष अधिकार समिती, रोजगार हमी योजना समिती, पंचायत राज समिती, आश्वासन समिती यासह एकूण २५ समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार असल्याची माहिती समोर आहे. यापूर्वी महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये ६०:२०:२० चा फॉर्म्युला असावा अशी मागणी भाजपने केली होती.

हे ही वाचा:

दुसर्‍या बाळंतपणासाठी सरकार महिलांना देणार ६ हजार रुपये!

इस्रायलमधून नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि….

घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते!

ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

त्यानंतर तीन पक्षांमध्ये भाजपाला ५० टक्के; शिवसेनेला २५ टक्के आणि राष्ट्रवादीला २५ टक्के असे वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठरलेल्या वाटणीचे चित्र लवकरच स्पष्ट होईणार आहे.

Exit mobile version