महाराष्ट्रात लसीकरणाच्या मुद्द्यावरून रण पेटले असतानाच या प्रकरणात ठाकरे सरकारचा पर्दाफाश झाला आहे. समोर आलेल्या काही सरकारी कागदपत्रांमधून महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नसून, सरकार असलेली लस वापरत नसल्याची बाब समोर आली आहे. ही कागदपत्रे बाहेर आल्यानंतर ठाकरे सरकारवर चौफेर टीका सुरु झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकरांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या अभद्र राजकारणाचा पर्दाफाश झाला आहे.” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात सध्या लसींचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण केले गेले. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून अपेक्षित लस पूरवठा होत नसल्याचे सांगितले तर अनेक ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आली. पण या सगळ्यात महाराष्ट्र सरकार पाहिल्यापासुनच तोंडावर पडताना दिसत आहे. आधी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी एका पात्रातून ठाकरे सरकारची पोलखोल केली तर आता महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचेच एक पत्रक समोर आले आहे ज्यावरून ठाकरे सरकारच्या साठेबाजीची पोलखोल होत आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू
लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?
नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड
पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली
ताबडतोब लस देण्याचे आदेश असतानाही ठाकरे सरकारकडून तीन लाख लसी राखीव ठेवण्यात आल्या. या ‘कोवॅक्सीन’ लसी फक्त दुसरा डोस ज्यांचा आहे त्यांच्यासाठी वापरण्यात याव्यात असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. याच सरकारी आदेशाच्या आधारे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
केंद्र सरकारच्या नावाने खोटी बोंबाबोंब करणाऱ्या सरकारचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे लस नाही असं खोटं बोलायचं आणि राज्यातील लसींचा साठा दडपून ठेवायचा. लसींचा काळाबाजार करण्याचा हा एक मार्ग आहे असे म्हणत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारवर खोटे आरोप केल्याबद्दल आणि महाराष्ट्रातील जनतेला शुक्रवारी लसीपासून वंचीत ठेवल्याबद्दल राज्य सरकारने माफी मागावी ऊशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
लसींच्या तुटवड्याचा दावा टिकताना दिसत नाही. प्रत्येक जिल्ह्यात किती लसी उपलब्ध आहेत याची माहितीच उघड झाली आहे. ठाकरे सरकार, आरोग्यमंत्री टोपे खोटं बोलतायत हे आता स्पष्ट झालंय. अभद्र राजकारणाचा पर्दाफाश झाला आहे. pic.twitter.com/b2puw9R7DK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 10, 2021