22 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरराजकारणशरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Google News Follow

Related

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असून अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवाय ते पत्र त्यांच्याच कार्यालयात टाईप करण्यात आले होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार यापूर्वी म्हणाले होते की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात त्यांचा हात नव्हता मात्र, प्रत्यक्षात त्यांनीच पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. या राष्ट्रपती राजवटीमागे भाजपाचा हात असल्याचे बोलले जात होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

“२०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं, परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शाह, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होतो. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा:

दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार

हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात 

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे स्पष्ट होतं. त्या बैठकीत हे ही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर सरकार स्थापन करू. त्या दरम्यान, शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील, अशी घोषणा करतील. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होते.” असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी शरद पवारांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा