पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींचा हा या वर्षातला तिसरा आणि एकूण ७५ वा मन की बातचा कार्यक्रम होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे.”
मोदी म्हणाले की, “गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल.” असं ते म्हणाले. “कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबत आहे, असं मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही- संजय राऊत
चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार
ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?
पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
याशिवाय त्यांनी या मन की बात मध्ये शेतकऱ्यांशीही संवाद साधला आणि त्यांना एक विशेष आवाहनही केले. मोदी म्हणाले की, “माझी इच्छा आहे की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि त्यांचे जीवन देखील सुमधुर होईल.”