महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या याचिका एकत्रित करून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या समोर हि सुनावणी होणार आहे. ठाकरें च्या गटाकडून हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंड पीठाकडे वर्ग करावे अशी मागणी करण्यात येत आहे. आजपासून सलग तीन दिवस हि सत्तासंघर्षाची लढाईची सुनावणी सुरु होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोन्ही बाजूचे वकील आज युक्तिवाद करणार आहेत. मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस हा युक्तिवाद झाला आहे. त्यात १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा , विधानसभा अध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव, आणि अध्यक्षांच्यावर अविश्वास ठराव कि नोटीस आणि उद्धव ठाकरे यांचा राजीनामा या सर्व विषयांचा वाद पार पडलेला आहे.
या सर्व याचिका एकत्र करून पाच न्यामूर्तींच्या खंडपीठासमोर हि सुनावणी सुरु आहे. तर ठाकरे गटाकडून सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणी हवी अशी मागणी करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणामध्ये १६ आमदार अपात्र होणार का हा खूप मोठा मुद्दा आहे. यासाठी काय युक्तिवाद असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विधान सभा अध्यक्ष यांचे दहाव्या सूचीनंतर काय अधिकार आहेत. याकडेसुद्धा लक्ष लागून राहिले आहे. यावर दोन्ही बाजूचे काय युक्तिवाद करतात हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित १६ आमदार यांच्या अपात्रतेच्या बाबतीत ठाकरे गटाकडून जास्त प्रभावी युक्तिवाद केला गेला असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याच वेळेला विधानसभा अध्यक्षांनी केलेली कारवाई हि नियमाला धरून नव्हती असे शिंदे गटाचे म्हणणे असून हा युक्तिवाद करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
याशिवाय सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्याबाबतीत सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला नुकतेच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. त्याविरुद्धच ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. आजपासून सलग तीन दिवस हि सुनावणी होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही गट आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी अनेक संदर्भ जोडत आहे. यामुळेच पुढील तीन दिवस काय युक्तिवाद होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.