25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणमहायुतीचं ठरलं, लोकसभा ४५ तर विधानसभा २२५ प्लस जागेचं टार्गेट!

महायुतीचं ठरलं, लोकसभा ४५ तर विधानसभा २२५ प्लस जागेचं टार्गेट!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.या बैठकीत महायुती लोकसभेच्या निवडणुकीत ४५ प्लस तर विधानसभेत २२५ प्लस जागेचा आकडा पार करेल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे. ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.आज मुंबईत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्याउपस्थितीत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.तेव्हा बावनकुळे बोलत होते. या बैठकीत मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे जाहीर मेळावे होणार आहेत. तसेच घटक पक्षाचे नेते देखील या मेळाव्याला हजर असणार आहेत. मोदींजींच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला एक मोठे यश मिळेल. ४५ प्लस जागा या राज्यात जिंकणार आहोत. ५१ टक्के मते मिळणार आहेत.आमच्या तीनही पक्षांनी महायुती मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रवेशाचे रोजच निमंत्रण येत आहे.

महायुतीमध्ये अनेक जण यायला इच्छुक असल्याचे देखील बावनकुळेंनी यावेळी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या मागे उभा आहे.राज्यातले ४५ च्या वर खासदार तुम्हाला महायुतीचे दिसतील.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला यश मिळेल.विधान सभेत महायुती २२५ प्लस जागा क्रॉस करेल.तसेच ४७ हजार ४१२ लोकांनी आमच्याशी संवाद साधला आणि ते म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच आम्हाला हवे आहेत.

हे ही वाचा:

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार

बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली १० वर्षे देशाचे नेत्तृत्व यशस्वीपणे केले आहे.राज्यात आज महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीचे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. राज्यव्यापी मेळावा आम्ही वरळीत घेतला होता. आमच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले होते. १४ तारीखपासून आम्ही मेळावे आयोजित केले आहेत. सहा प्रादेशिक विभागात आम्ही मेळावे आयोजित केले आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही जाहीर मेळावे आम्ही करणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे बैठकीत म्हणाले की, अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झालेले आहेत. तसेच विभाग पातळीवर, गाव पातळीवर महायुतीचे सर्व मेळावे आपण आयोजित करत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा