नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारला खडेबोल सुनावले आहेत. या दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी संदेशखाली येथील महिलांचीही भेट घेतली. बारासातच्या सभेत राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले. संदेशखालीत जे काही घडले, ते पाहून कुणाचीही मान शरमेने खाली झुकेल पण, इथल्या सरकारला काहीही फरक पडत नाही. बंगाल सरकार आरोपींना वाचवण्यासाठी सर्वप्रकारच्या बळाचा वापर करताना दिसत आहे,” असे टीकास्त्रही नरेंद्र मोदींनी सोडले.
पंतप्रधान मोदींनी बारासात येथील जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संदेशखाली प्रकरणाचा संदर्भ देत नरेंद्र मोदी म्हणाले की, “याच भूमीवर टीएमसी राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. संदेशखळीत जे काही घडले, ते पाहून कुणाचेही डोके शरमेने झुकते. पण इथल्या सरकारला काही फरक पडत नाही. बंगाल सरकार आरोपींच्या संरक्षणासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे. टीएमसीचे नेते ठिकठिकाणी बहिणी आणि मुलींवर अत्याचार करत आहेत. ते त्यांच्या नेत्यांवर विश्वास ठेवतात पण त्यांच्या माता-भगिनींवर विश्वास ठेवत नाहीत पण, बहिणी आणि मुली टीएमसीच्या माफिया राजवटीचा नाश करण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. टीएमसी सरकार कधीही बहिणी आणि मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही. भाजपाने बलात्काराच्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूदही केली आहे,” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल सरकारवर केली आहे.
हे ही वाचा :
रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!
पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यास ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरकडून संरक्षण
वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?
संदेशखालीमधील महिलांची घेतली भेट
दरम्यान, नरेंद्र मोदींनी संदेशखालीच्या पाच महिलांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महिलांनी पंतप्रधान मोदींना व्यथा सांगितली. या महिलांनी पंतप्रधानांना सांगितले की, टीएमसी नेते शेख शाहजहानचे लोक अजूनही त्यांना धमकावत आहेत. पीडित महिलांचे म्हणणे ऐकताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचीही माहिती आहे. कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी महिलांना दिली.