मालवाहतूक बंदराला जोडणारा कॉरिडॉर हेच लक्ष्य

मालवाहतूक बंदराला जोडणारा कॉरिडॉर हेच लक्ष्य

महाराष्ट्रातील डेडिकेटेड कॉरिडॉरच्या कामाला आता गती मिळणार आहे. ५० हजार कोटींचा हा कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटीच्या मालवाहतूक बंदराला जोडण्यात येणार आहे.

मालवाहतूक थेट गतीने बंदरात पोहचण्यास याची मदत होणार आहे. सध्या महारष्ट्रासाठी विचार केला असता या कॉरिडॉरचे काम पूर्ण करणे हेच प्राधान्य असणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारसोबत त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातील अडथळे दूर करणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ला दिली.

रेल्वेची कामे ही कधीही न संपणारी असतात आणि ही कामे एका रात्रीत किंवा एका वर्षात पूर्ण होतातच असे नाही. त्यामुळे जी कामे हाती घेतली आहेत, त्यातील कामाचे प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्यावर भर दिला जातो. महिन्याभरापूर्वीच ही जबाबदारी आपल्याकडे आली आहे. महिन्याभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यातील प्राधान्यक्रम समजावून घेतला. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा ५० हजार कोटींचा कॉरिडॉर प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारशी चर्चा करून प्रकल्पासाठी पुढाकार घेणार आहे. पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची पळापळ सुरूच

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक

तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद

मराठवाड्यातील रेल्वे समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी मराठवाड्यातील १२ खासदारांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंबंधीच्या सूचना त्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना दिल्या आहे.

Exit mobile version