देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

नीट पेपरफुटी प्रकरणावरून संसदेत गदारोळ

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

देशात सोमवार, २२ जुलै पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात नीट पेपर लीक प्रकरणावरून खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

पेपर लीकच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “शिक्षणमंत्री स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष देत आहेत. यांना सभागृहात सुरू असलेल्या चर्चेच्या मूलभूत गोष्टींचीही जाणीव आहे असे वाटत नाही.” याला धर्मेंद्र प्रधान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “माझे शिक्षण आणि माझी मूल्ये, माझे सामाजिक जीवन याला माझ्या राज्याची आणि जनतेची मान्यता मिळाली आहे. यासाठी सभागृहातून कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. लोकशाही देशाने पंतप्रधान मोदींना निवडून दिले आहे आणि मी त्यांची निर्णयामुळे येथे सभागृहात उत्तर देत आहे. देशाची सध्याची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे, यापेक्षा दुर्दैवी विधान देशाच्या विरोधकांकडून असू शकत नाही,” अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, “नीट युजीसी पेपर लीकची आतापर्यंत फक्त एकच घटना पटनामध्ये समोर आली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून नीट परीक्षेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. परीक्षा आयोजित करण्यासाठी स्थापन केलेल्या ४,७०० केंद्रांपैकी केवळ एकाच ठिकाणाहून विसंगती आणि गैरप्रकारांची माहिती मिळाली आहे,” असं स्पष्टीकरण धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत दिलं.

हे ही वाचा:

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…

“यंदाचा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया रचणारा असेल”

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी नीट पेपर फुटीवरून म्हणाले की, “आपल्या देशाच्या परीक्षा पद्धतीत मोठी समस्या आहे. हा फक्त नीट परीक्षेचा प्रश्न नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इतरांना दोष दिला आहे. मला वाटत नाही की त्यांना सभागृहात काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील असावी.”

Exit mobile version