शिवसेना, धनुष्यबाण कोणाच्या भात्यात? आज होणार निर्णय

निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

शिवसेना, धनुष्यबाण कोणाच्या भात्यात? आज होणार निर्णय

मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे आणि लेखी अर्ज सादर करण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. त्यानंतर दोन-चार दिवसांत आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहेत. आजच निकाल लागणार की न्यायालय निकाल राखून ठेवणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह, धनुष्यबाण यांवर बंदी घातली होती आणि दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे दिली होती. एक गट शिवसेनेचे नाव आणि दुसरा धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळविण्यात यशस्वी होणार की काय, यावर आयोग आता अंतिम निकाल देणार असून, या निर्णयाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार शिंदे गटाकडे असून राष्ट्रीय कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळेच खरी शिवसेना आमची असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेला आणि पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांच्या निवडीला निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !

शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी

अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत

ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?

ठाकरे गटाने शिंदे गटाचे आक्षेप फेटाळून लावले, आमदारांच्या अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर प्रलंबित असताना आयोगाने या प्रकरणाचा निर्णय घेऊ नये. राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार आमच्यासोबत आहेत. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे मुद्दे ठाकरे गटाने उपस्थित केले आहेत. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपला.

 

 

Exit mobile version