कालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तराखंडला अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीला भारतीय लष्करात मेजर पदावर बढती मिळाली आहे. मुलीच्या प्रमोशनची बातमी कळताच रमेश निशंक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या मुलीच्या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
मित्रों!
आज का दिन मेरे लिए अपार गौरव एवं गर्व से अभिभूत करने वाला दिवस है। आज #InternationalWomensDay होने के साथ ही बेटी श्रेयसी निशंक की भारतीय सेना में मेजर पद पर पदोन्नति हुई है। pic.twitter.com/wozJV51AH1— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) March 8, 2022
रमेश पोखरियाल निशंक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कालच्या महिला दिनानिमित्त एक अतिशय सुंदर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की देवभूमी उत्तराखंड ही शूर मातृत्वाची भूमी आहे. येथे सरासरी, प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सैन्यात भरती होते आणि आपली सेवा देशासाठी समर्पित करते. देवभूमीची ही सुवर्ण आणि अभिमानास्पद परंपरा माझ्या मुलीने पुढे नेली याचा मला खूप आनंद आहे. आपल्या मुली जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाज आणि देशाला पुढे नेत आहेत.
विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश निशंक यांची मुलगी श्रेयसी भारतीय सैन्यात येण्यापूर्वी लाखोंच्या पॅकेजवर परदेशात काम करत होती. पण देशसेवेची तळमळ श्रेयसीमध्ये भरली होती, त्यामुळे तो नोकरी सोडून भारतात आली आणि सैन्यात दाखल झाला. श्रेयशीची २०१८ साली भारतीय सैन्यात निवड झाली होती. तिने त्यांनतर लष्करातील आर्मी मेडिकल सर्व्हिसेसचा MOBC 224 कोर्स पूर्ण केला होता.
हे ही वाचा:
मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर
फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांनी आळवला जुनाच राग
भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
कालच्या महिला दिनाचे निमित्त साधून अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला होता.