पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची एनडीएमधील घटक पक्षांनी एकमताने नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्याची तयारी राष्ट्रपती भवनात सुरू असून आता नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथ ग्रहण करणार आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी ५ ते ९ तारखेपर्यंत राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी बंद असेल. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत सरकार स्थापन करण्याचे चित्र स्पष्ट केले आहे. एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे. एनडीए बैठकीतील प्रस्तावावर २१ नेत्यांनी सह्या केल्या आहेत. मोदींच्या शपथविधीसाठी भूतान, नेपाळ आणि मॉरिशसच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे उपस्थित असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
PM Narendra Modi's swearing-in ceremony may take place on 9th June at 6 pm. It was earlier scheduled for 8th June, official confirmation on the final date is awaited: Sources
(file photo) pic.twitter.com/nSWvxz9Ga4
— ANI (@ANI) June 6, 2024
हे ही वाचा:
रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!
एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार
युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ‘एक्स’वर निकालानंतर प्रतिक्रिया दिली होती. ‘देशातील जनता-जनार्दनाने एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या स्नेह आणि आशीर्वादासाठी मी माझ्या शुभचिंतकांना नमन करतो. मी देशवासींना विश्वास दाखवतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवी ऊर्जा, नव्या इच्छा, नव्या संकल्पांसह पुढे जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पण भावनेने अथक मेहनत केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो,’ अशा शब्दांत मोदी यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.