‘मोफत रेवडी वाटून मते गोळा करणारी संस्कृती देशासाठी घातक’

‘मोफत रेवडी वाटून मते गोळा करणारी संस्कृती देशासाठी घातक’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले

आपल्या देशात मोफत रेवडी वाटून मते गोळा करण्याची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही रेवडी संस्कृती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे. देशातील जनतेला या रेवडी संस्कृतीपासून खूप सावध राहावे लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड एक्सप्रेस-वेच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.

आधुनिक बुंदेलखंडाच्या विकासासाठी सुमारे १४ हजार ८५० कोटी रुपये खर्च करून उत्तर प्रदेशात हा सहावा एक्सप्रेस वे सुरू करण्यात आला असून तो २९६ कि.मी लांबीचा आहे. बुंदेली भाषेत संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी बुंदेलखंडच्या वेद व्यासांचे जन्मस्थान असलेल्या आमच्या बैसा लक्ष्मीबाईच्या भूमीवर येण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. बुंदेलखंडचे आणखी एक आव्हान कमी करण्यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही जल जीवन मिशनवर काम करत आहोत असेहैी पंतप्रधान यावेळी म्हणाले. फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या एक्सप्रेसवेची पायाभरणी झाली होती.

रेवडी संस्कृती असलेले लोक तुमच्यासाठी नवीन एक्सप्रेसवे, नवीन विमानतळ किंवा संरक्षण कॉरिडॉर कधीच बांधू शकणार नाहीत. मोफत रेवडीचे वाटप करून आपण सर्वसामान्य जनतेला विकत घेता येईल, असे या रेवडी संस्कृतीतील लोकांना वाटते. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या या विचारसरणीचा पराभव करायचा आहे, देशाच्या राजकारणातून रेवडी संस्कृती हटवायची आहे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण कोणताही निर्णय घेतो, धोरण बनवतो त्यामागे, त्यामागील सर्वात मोठा विचार हा असावा की यातून देशाच्या विकासाला आणखी गती मिळेल असा मोठा विचार असणे गरजेचे आहे परंतु देशाला हानी पोहोचवणारी, देशाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण दूर राहिले पाहिजे.

उत्तर प्रदेशात सरयू कालवा प्रकल्प पूर्ण व्हायला ४० वर्षे लागली, गोरखपूर खत प्रकल्प ३० वर्षे बंद होता, अर्जुन धरण प्रकल्प पूर्ण व्हायला १२ वर्षे लागली, अमेठी रायफल कारखाना फक्त एक फलक लावून उभारला होता अशा उत्तर प्रदेशात आता त्या पायाभूत सुविधांचे काम इतक्या गांभीर्याने केले जात आहे की त्याने चांगल्या राज्यांनाही मागे टाकले आहे. चित्रकूट ते दिल्ली हे अंतर बुंदेलखंड एक्सप्रेसवेने ३-४ तासांनी कमी झाले आहे, पण त्याचा फायदा त्याहून अधिक आहे. या एक्स्प्रेस वेमुळे येथील वाहनांना वेग तर मिळेलच, पण त्यामुळे संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीलाही गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

असा आहे बुंदेल खंड एक्सप्रेस वे
मूळ निश्चित बांधकाम कालावधी : ३६ महिने, विक्रमी २८ महिन्यांत पूर्ण
भविष्यात एक्सप्रेस वे ६ मार्गिकांचा करता येणे शक्य
एक्सप्रेसवे चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूट क्षेत्राजवळील गोंडा गावात संपेल
एक्सप्रेसवेवर ३. ७५ मीटर रुंद सर्व्हिस लेन, एक्सप्रेसवेची रुंदी ११० मीटर
बुंदेलखंडातील २०० पेक्षा जास्त गावकऱ्यांना होणार लाभ, १५० पेक्षा जास्त गावांचा समावेश
वागेन, केन, श्यामा, चंदावल, बिरमा, यमुना, बेतवा व सेंगर या सात नदींवरून जाणार एक्सप्रेसवे
एक्सप्रेसवेवर २५० लहान पूल, १५ पेक्षा जास्त फ्लायओव्हर, १३ टोल प्लाझा.

Exit mobile version