महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट गडद

महाराष्ट्रावरील कोरोना संकट भीषण झाले आहे. अवघ्या राज्यावर संपूर्ण टाळेबंदीची छाया आहे. राज्यातील विविध शहरांत कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट गडद

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज प्रत्येक शहरात प्रचंड मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. काही ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. राज्यात विविध ठिकाणी सरकारी यंत्रणांची तयारीच पुरेशी नसल्याने लोकांचे हाल होत आहेत.

पुणे

पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यात अत्यंत भयंकर परिस्थिती ओढावली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी बेड्सच उपलब्ध नसल्याची अवस्था निर्माण झाली आहे. शहरात फक्त दोन व्हेंटिलेटर बेड आणि पाच आयसीयु बेड उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

तिसरी विकेट कोणाची?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाले आहे. दानवे यांनी मी जबाबदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी गर्दी केली. त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाने गर्दी जमवली होती. दरम्यान औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा मोठी रुग्णवाढ नोंदली गेली होती.

मुंबई

मुंबईतील विविध भागात कोरोनाचा फैलाव होत आहे. चेंबूर हा मुंबईसाठी नवा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे या भागात मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत जागृती निर्माण करणे आवश्यक झाले आहे.

राज्याच्या विविध शहरांत सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असताना, ब्रेक द चेन बाबत निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत व्यापारी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देतात का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

Exit mobile version