ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यांनी दोषमुक्तीचा केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून शिवसेनेचे आमदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर छापल्याचा आरोप शेवाळे यांनी केला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज माझगाव न्यायालयाने फेटाळला आहे. राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात आपली बदनामी झाल्याचा आरोप करत मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. अखेर न्यायालयाने हा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे.
राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी सांगितलं की, “माझ्या आशिलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं त्यांच्या याचिकेतून मान्य करण्यात आलं आहे. पण ते कृत्य आम्ही केलेलं नाही तर आमच्या वृत्तपत्राचे जे सहसंपादक अतुल जोशी आहेत ते या बातमीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना विरोधातील अब्रुनुकसानीच्या खटल्यातून दोषमुक्तक करण्यात यावं,” अशी मागणी यातून केल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
चेक प्रजासत्ताकमध्ये १० लाख डॉलरचा पाऊस!
अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणावरील निकालानुसार, कोणत्याही वृत्तपत्राचे मालक- संपादक हे प्रत्येक छापून येणाऱ्या गोष्टीसाठी जाबबदार असतील. त्यानुसार, उद्धव ठाकरे मालक आणि मुख्य संपादकही आहेत, असंही शेवाळेंच्या वकिलांनी सांगितलं आहे.