मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना महाविकास आघाडीला दणका बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नसल्याने ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिका फेटाळण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. न्यायालयाने निकाल जाहीर करत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा दणका दिला आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी या दोघांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं वाया जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेच्या मतदानासाठीही अर्ज करण्यात आला होता. मात्र, याचिका देखील फेटाळण्यात आली. अखेर विधानरपरिषदेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता पुन्हा न्यायालयाने दणका दिला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी

अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही नेते सध्या तुरुंगात आहेत. दोघांना अद्याप त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असेही युक्तिवादाच्या वेळी दोन्ही नेत्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. तसेच दोघांना मतदानासाठी परवानगी देण्याचा विशेषाधिकार न्यायालयाला असल्याचा दावाही करण्यात आला होता. तर, कायद्याने कैद्यांना मतदानाचा हक्क नसल्याचा दावा ईडीतर्फे करण्यात आला होता.

Exit mobile version