केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

गुजरात सरकारच्या ई-गव्हर्नन्स मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी केरळ सरकारने आपले मुख्य सचिव गुजरातला पाठवण्याचा निर्णय घेतला. केरळसाठी डॅशबोर्ड प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव व्हीपी जॉय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय पथकाला तीन दिवसांसाठी गुजरातला पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भाजपशासित गुजरातमध्ये सुशासन असल्याचे मत व्यक्त केले आहे.

केरळमधील सीपीआय-एमच्या पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला गुजरातची डॅशबोर्ड प्रणाली आवडली आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना गुजरातला पाठवण्याचा निर्णय पिनाराई विजयन यांनी घेतला आहे. गुजरातची डॅशबोर्ड प्रणाली राज्यातील सर्व विकास प्रकल्पांची रिअल-टाइम माहिती एकाच डॅशबोर्डवर पुरवते. म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकल्पाबाबत जाणून घ्यायचे असेल, तर कुठे काय चालले आहे, हे लगेच कळते. मात्र केरळमधील सीपीआय(एम) सरकारची ही योजना विरोधी पक्षांना आवडली नसून त्यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा:

कारागृहात असताना रवी राणा यांचा वाढदिवस साजरा

Twitter बोलणार मस्क बोली

काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?

योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले

सीपीआय(एम) सरकारच्या योजनेंतर्गत, राज्याच्या मुख्य सचिवांसह दोन सदस्यीय चमू गुजरातमध्ये जाऊन सुशासनाला मदत करणाऱ्या ‘डॅशबोर्ड’ प्रणालीचा अभ्यास करणार आहेत. केरळचे मुख्य सचिव व्हीपी जॉय आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी उमेश एन.एस. के २७ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान भाजपशासित गुजरातला भेट देत आहेत. दोन्ही अधिकारी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘डॅशबोर्ड सिस्टम’वरील सादरीकरणाला उपस्थित राहणार आहेत. ही डॅशबोर्ड प्रणाली प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Exit mobile version