राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यादरम्यान विधिमंडळात महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी.बा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करत नामांतराचा ठराव मंजूर केला आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाला याची शिफारस केली आहे आणि यांसंदर्भांत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी कोसळत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी निर्णयांचा धडाका लावला होता. त्या निर्यातील नामांतराचे मुद्दे चर्चेत आले. मात्र, राज्यात सत्तापालट झाले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. अल्पमतात निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला स्थगिती देत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे औरगांबादचं नामांतर केलं.
हे ही वाचा:
झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपद गमावण्याची वेळ?
यूपी साकारला १८ फुटी ‘स्वर्ण गणेश’
युक्रेनवरील रशियाच्या रॉकेट हल्ल्यात २२ ठार
मुंबईच्या खड्ड्यांतली ‘मलई’ येत्या दोन वर्षांत बंद
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, नामांतर करायचे असेल तर मी आता करतो. मात्र, नागरिकांना आधी सुखसोयी, पाण्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत मग नामांतर करू. परंतु महाविकास आघाडी खिळखिळी होत असताना उद्धव ठाकरेंनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मंत्र्यांसमोर अनेक निर्णय घेतले होते.