होशंगाबाद शहर आता ओळखले जाणार नर्मदापुरम नावाने

होशंगाबाद शहर आता ओळखले जाणार नर्मदापुरम नावाने

मध्य प्रदेशातील होशंगाबाद शहर आता नर्मदापुरम म्हणून ओळखले जाणार आहे आणि होशंगाबाद जिल्ह्यातील बबई शहर आता माखन नगर म्हणून ओळखले जाणार आहे. होशंगाबादचे नर्मदापुरम आणि बबईचे माखन नगर असे नामकरण करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री चौहान यांनी ३ फेब्रुवारी रोजी उशिरा एका ट्विटद्वारे सांगितले की “पवित्र नर्मदा नदीवर वसलेले होशंगाबाद शहर आता मध्य प्रदेशची जीवन माता मैय्या नर्मदा यांच्या जयंतीच्या शुभ दिवसापासून ‘नर्मदापुरम’ म्हणून ओळखले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

ते पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की – “मुझे तोड़ लेना वनमाली! उस पथ पर देना तुम फेंक। मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ जावें वीर अनेक” या कवितेचे लेखक दादा माखनलाल चतुर्वेदी यांचे जन्मस्थान असलेल्या बबईचे नाव बदलून ‘माखन नगर’ करण्याची विनंती केंद्र सरकारने मान्य केली आहे. बबईच्या नागरिकांची विनंती मान्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार.

हे ही वाचा:

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’

‘सवलतीचा गैरफायदा घेऊ नका!….. ‘ नवाब मलिकना उच्च न्यायालयाने खडसावले

भारतीय कवितेतील प्रख्यात कवी आणि महान व्यक्तिमत्व दादा माखनलाल यांना आदरांजली म्हणून बबई आता ‘माखन नगर’ म्हणून ओळखले जाणार आहे. दादा माखनलाल यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. यासोबतच होशंगाबाद जिल्ह्याचे ‘नर्मदापुरम’ असे नामकरण करण्याच्या विनंतीलाही केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. नर्मदा जयंतीच्या शुभमुहूर्तापासून ही नावे लागू केली जाणार आहेत. होशंगाबाद आणि बबईवासीयांसह संपूर्ण राज्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन, असेही मुख्यमंत्री चौहान म्हणाले.

Exit mobile version