उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.सभेला संबोधित करताना मंत्री अमित शहा म्हणाले की, ४ जून रोजी एनडीएचा विजय निश्चित आहे आणि त्याच दिवशी राहुल गांधी यांची टीम पत्रकार परिषद घेतील आणि पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात करतील.ते पुढे म्हणाले, खर्गे साहेब तुम्ही पण समजून घ्या, पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर (राहुल-प्रियंका) नाही तर पराभवाचे खापर तुमच्यावर फुटणार आहे.मल्लिकार्जुन खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार.., असे मंत्री अमित शहा म्हणाले.
सभेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जबाबदार धरले जाईल. यानंतर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले जाईल. ते पुढे म्हणाले की, ४ जून रोजी राहुल बाबांचा पक्ष ४० जागा सुद्धा पार करू शकत नाही आणि अखिलेश बाबू ४ जागा देखील पार करू शकणार नाहीत.ते पुढे म्हणाले, देशाच्या जनतेने ठरवले आहे की पुढील ५ वर्षे नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील.
हे ही वाचा:
ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?
‘आप’चा पाय आणखी खोलात; स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन नाकारला
डॉ.अजय तावरे म्हणतो, ‘मी शांत बसणार नाही, सर्वांची नावे घेणार’
डॉ. डेरेंनी गाडी चालविली, तेव्हा महिला सायन रुग्णालयासमोर रस्त्यावर झोपली होती!
लोकसभेचे सहा टप्प्याचे मतदान संपले आहे.माझ्याकडे ५ टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी ३१० जागेचा आकडा पार केला आहे.आता सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे, सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ४०० पार करायचं आहे, असे आवाहन अमित शहांनी जनतेला केलं.