नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काल हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज छत्तिसगढमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार नक्षलवादाचं उच्चाटन करायला कटिबद्ध आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहाय्याने नक्षलवादाला संपुर्ण बरखास्त करण्यासाठी कटिबद्ध आहे.” अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राज्यातील काही वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्याशी बैठक झाल्यानंतर हे स्पष्ट केले होते. ही बैठक जगदलपूर येथे पार पडली होती.
हे ही वाचा:
कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?
अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक
दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री?
गृहमंत्री म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरुद्धची लढाई निर्णायक वळणापर्यंत आली होती. या अत्यंत दुर्दैवी प्रसंगाने या लढाईत पुढचे पाऊल टाकले गेले आहे. शहा यांनी देशातल्या जनतेला असा विश्वास दिला की देश या डाव्या अतिरेकापुढे झुकणार नाही, आणि या प्रसंगानंतर सुरक्षा बलाच्या हिंमतीत वाढच होईल.
मंत्रिमहोदयांनी असेही सांगितले की या हल्ल्यामागचे कारण म्हणजे अतिशय दुर्गम भागात देखील विकास होऊ लागला आहे.
“मी देशवासियांना विश्वास देऊ इच्छितो, की यापुढे ही लढाई अधिक तीव्र होईल आणि शेवटी आपला विजय नक्की होईल. आम्ही अतिदुर्गम भागात देखील कँप उभे केले आहेत आणि त्यामुळे त्रस्त झालेले नक्षलवादी अशा प्रकारचे हल्ले करण्यास उद्युक्त होत आहेत.” ते पुढे असेही म्हणाले की, “मी छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ते म्हणाले की ही लढाई कमकूवत होता कामा नये, हे आपल्या जवानांचे मनोबल खचले नसल्याचे लक्षण आहे.”
यापुर्वी गृहमंत्र्यांनी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. सुकमा-बिजापूर सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांशी झडलेल्या चकमकीत २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले तर ३१ जवान जखमी झाले.