25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणअनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न

अनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न

भाजपप्रणित हल्ला असल्याचा आरोप भाजपाने फेटाळला

Google News Follow

Related

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर नागपूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली. काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आणि यात अनिल देशमुख यांच्या गाडीचे नुकसान झाले असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून हा हल्ला भाजपप्रणित असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, अनिल देशमुखांवरील हल्ल्यामागे भाजपा असल्याचा दावा भाजपाकडून फेटाळण्यात आला असून हा हल्ला म्हणजे स्टंटबाजी असल्याचं भाजपाने म्हटले आहे.

भाजपा नेते परिणय फुके यांनी अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सहानुभुती मिळवण्यासाठी दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाली. देशमुखांच्या गाडीच्या काचांना क्रॅक गेलेले दिसत आहेत. दगड जर लांबून फेकलेला असता तर काचेवर पडला असता मग तो बोनेटवर पडला असता. पण गाडीच्या बोनेटवर एकही निशाण दिसत नाही. गाडीची मागच्या बाजूची काच फुटलेली आहे. देशमुख ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आहेत. त्यांच्या पायाजवळ एक दगड पडलेला दिसत आहे. या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असं परिणय फुके यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

मतदानावेळी मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपास करू नये; सपाचे निवडणूक आयोगाला पत्र

आचारसंहितेच्या काळात कारवाई दरम्यान ६६० कोटींची मालमत्ता जप्त

व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे

मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात

नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आली आहे. सलील देशमुख यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांनी जखमी झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा