अफगाण हिंदू-शीख शिष्टमंडळाने भेट घेऊन पंतप्रधान मोदींचे मानले आभार

अफगाण हिंदू-शीख शिष्टमंडळाने भेट घेऊन पंतप्रधान मोदींचे मानले आभार

अफगाणिस्तानातील अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख समाजातील लोकांच्या एका गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. भारतीय वंशाच्या अफगाण नागरिकांना कठीण काळात मदत केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

शिष्टमंडळाने अफगाण अल्पसंख्याकांचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल आणि तालिबानचा ताबा घेतल्यानंतर त्यांना आश्रय दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. यादरम्यान २०२० मध्ये तालिबानने अपहरण केलेला अफगाण नागरिक निदान सिंग सचदेवा देखील उपस्थित होता.

पंतप्रधानांना भेटलेल्यांमध्ये गुलजीत सिंग, हरभजन सिंग, डॉ. रघुनाथ कोचर, अफगाण वंशाचे भारतीय व्यापारी बन्सरी लाल एरेंडे यांचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्याचे अफगाणिस्तानातून अपहरण करण्यात आले होते. गेल्या दोन दशकांत भारतात आलेले अफगाण वंशाचे हिंदू आणि शीख बहुधा या बैठकीला उपस्थित होते. यापैकी काही असेही आहेत, जे अलीकडेच अफगाणिस्तानातून आणले गेले आहेत.

पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, टीममध्ये समाविष्ट असलेल्या लोकांनी वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशन, मनदीप सिंग सोबती फाऊंडेशन आणि पुनीत सिंग चांडोक इंडियन वर्ल्ड फोरमसह अनेक भारतीय संस्थांचे अभिनंदन केले. या संघटनांनी अफगाण नागरिक निदान सिंग सचदेवा यांच्या पुनर्वसनासाठी खूप काम केले आहे.

हे ही वाचा:

शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

‘दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम अहवाल कुठे आहे? डॉक्टरांना कुणी दम दिला’

अफगाणिस्तानमध्ये सुमारे वीस वर्षे राहिल्यानंतर, यूएस आर्मी ३० ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या मायदेशी परतली. यासह १४ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या शीख आणि हिंदूंना भारतात आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यापासून ते सर्व मंत्री या मोहिमेत गुंतले होते. अफगाणिस्तानातील ऐतिहासिक गुरुद्वारातून श्री गुरु ग्रंथ साहिब आणि हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version