मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली होती तर सुरक्षा यांत्रणादेखील अलर्ट मोड वर आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना धमकीसाठी आलेला फोन खोटी माहिती देणारा होता हे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लोणावळा येथून एकाला अटक केली आहे. अविनाश वाघमारे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अविनाश हा रविवार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वळवन येथे असलेल्या हॉटेल साई कृपा येथे दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने पाण्याची बॉटल खरेदी केली. मात्र, पाण्याच्या बॉटलची किंमत १० रुपये असताना हॉटेलकडून १५ रुपये घेण्यात आले. पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याचे उद्देशाने आपल्या मोबाईल क्रमांकावरून अविनाश याने पोलिस नियंत्रण कक्षाला म्हणजेच १०० नंबरवर कॉल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली.
हे ही वाचा:
देवीदेवतांची टिंगल उडवणारा मुनव्वर फारुकी गरब्यात मात्र नाचतो
धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट
प्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता
फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी
मात्र, या फोननंतर काल राज्यभरात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांना याआधी जीवे मारण्याचे धमकीचे पत्र मिळालं होतं. माओवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अविनाश याच्यावर कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.