ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर तुमचा तपास थांबवून तपासाची सर्व कागदपत्रे एनआयएच्या हाती सुपूर्द करा असा आदेशही सत्र न्यायलयाने एटीएसला दिला आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथून ५ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या हत्येचा तपास एटीएसने करायला सुरूवात केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच हा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी अधिसूचना देखील काढण्यात आली होता. तरीही एटीएसने याबाबतची कागदपत्रे एनआयएला दिली नव्हती.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले
पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत
मनसुख हिरेन यांच्या हत्येबरोबरच गाडीतील स्फोटकांचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. एनआयएने सचिन वाझे याला याच तपासांतर्गत ताब्यात घेतले होते. सचिन वाझेचा संबंध मनसुख हिरेन यांच्या हत्येशी असल्याचे काही पुरावे एटीएसला सापडले होते. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास देखील एनआयएकडे सोपवण्यासंबंधीचेे आदेश एटीएसला देण्यात आले.
यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांनी फेसबूकवर पोस्ट करून मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपासाचे गूढ उलगडले असल्याचे सांगितले होते. त्याबरोबरच एटीएसने या खटल्यातील काहींना अटक देखील केली होती.
दोन्ही आरोपी आणि कागदपत्रेही करणार स्वाधीन
न्यायलयाने संपूर्ण तपासाबरोबरच दोन्ही आरोपींना देखील एनआयएच्या ताब्यात देण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे एटीएस लवकरच विनायक शिंदे आणि नरेश धरे यांना देखील एनआयएच्या ताब्यात दिले जाणार आहे. सचिन वाझे याची एनआयएकडची कस्टडी उद्या संपत असल्याने त्याला उद्या पुन्हा न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.