30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणसक्तीने बंद करण्यासाठी ठाणे उपमहापौरांचे पती पवन कदम यांनी केली रिक्षाचालकांना मारहाण

सक्तीने बंद करण्यासाठी ठाणे उपमहापौरांचे पती पवन कदम यांनी केली रिक्षाचालकांना मारहाण

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी केलेल्या महाराष्ट्र बंदला सर्वसामान्य जनतेने नाकारले असल्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी आता रिक्षाचालक, बसेस यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ठाण्यातील उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम यांनी ठाण्यातील रिक्षाचालकांच्या कानशिलात लगावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिकांकडे हातात काठीही होती, त्यानेही रिक्षाचालकांना मारहाण करण्यात येत होती. रिक्षाचालकांना अडवून त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात येत होते. या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

पवन कदम हे शिवसैनिकांसह ठाण्यातील रस्त्यावर उतरून रिक्षाचालकांना रोखत होते. रिक्षाचालकांना अडवून त्यांना मारहाण करण्यात येत होती. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, असे घडले असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र आमच्या बंदमध्ये सगळे सहभागी झाले आहेत. आम्ही जबरदस्ती केलेली नाही. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, हे अत्यंत निषेधार्ह आहे. व्हीडिओत सगळे स्पष्ट दिसत असतानाही काही घडलेच नाही, असा कांगावा करण्यात येत आहे.

 

हे ही वाचा:

रेल्वेची ‘पिकदानी पाकिटे’ संकल्पना काय आहे? वाचा सविस्तर

धमकावणाऱ्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी कांदिवलीत भाजपा उतरली रस्त्यावर

अनिल देशमुखांच्या मुलाला होणार अटक?

ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!

 

लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्युच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या तीन पक्षांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. मात्र ते करण्यासाठी दुकानदारांवर दबाव आणण्यात आला. रिक्षाचालकांना रोखून त्यांना पुढे जाऊ दिले जात नव्हते. काही बसेसचीही तोडफोड केल्याचे समोर आले.

महाराष्ट्रात प्रथमच सत्तेतील पक्षांनी बंद केल्याचे उदाहरण समोर आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचेच कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरून जाळपोळ, दुकाने बंद करण्याचे आणि रस्ते अडविण्याचे काम करत असल्याचे दिसले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा