ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे आज निधन झाले. एका प्रदीर्घ आजारामुळे चव्हाण यांना देवाज्ञा झाली. गेले अनेक दिवस ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवार ७ मे रोजी सुधाकर चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. या वेळी त्यांचे वय ६५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुलेखा आणि मुलगा प्रन्मय असा परिवार आहे. सुधाकर चव्हाण हे ठाण्यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक होते. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी इतर अनेक पदे भूषवली, ज्यामध्ये ते चार वेळा स्थायी समितीचे सभापती म्हणून ते निवडून आले होते. तर एकदा परिवहन समितीचे सभापती पद त्यांनी भूषविले होते.
१९९२ ते २०१७ अशी तब्बल पंचवीस वर्ष म्हणजे एकूण पाच टर्म सुधाकर चव्हाण हे महापालिकेत निवडून जात होतो. एका सामान्य कुटुंबातून येणारे चव्हाण हे आधी रिक्षाचालक होते. तर त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या प्रभागात अतिशय कार्यक्षम नगरसेवक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने प्रभागात शोककळा पसरली आहे. तर ठाणेकरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास
चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
रविवार, १८ मे रोजी सुधाकर चव्हाण यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. सकाळी ११ वाजता मंत्रांजली या त्यांच्या निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.