भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

ठाण्यातील वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर राहुल घुले यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट केल्यानंतर सारा महाराष्ट्र हादरून गेला तर या विषयावरून आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे. ‘भ्रष्टाचाराची मालिका हीच का ठाणे महापालिका?’ असा सवाल भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला आहे.

रविवार, १३ जून रोजी ठाण्यातील वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे ट्विट करत थेट पंतप्रधान कार्यलयाकडे मदत मागितली. आपल्याला राजकीय एजंट कडून धमकीचे कॉल सुरू असून आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट डॉ. घुले यांनी ट्विटर वर केले होते. तर ठाण्यात आपण सुरक्षित नसून कुटुंबियांसह कायमचे दिल्ली येथे स्थायिक होत असल्याचे घुले यांनी ट्विटरवर म्हटले आहे. पण कालांतराने त्यांनी आपली ही ट्विट्स डिलीट केली आहेत.

हे ही वाचा:

…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई

शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांना धमकी; पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली मदत

गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!

पण या विषयावरूनच आता ठाण्याचे राजकारण तापताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेवर आणि सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत निरंजन डावखरे यांनी डॉ.राहुल घुले प्रकरणावरून. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले निरंजन डावखरे?
राहुल घुले यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे सरकारच्या एजंटकडून टक्केवारी मागितल्याचेही आरोप त्यांनी केला आहे. तर महापालिकेकडून राहुल घुले यांची ५० लाखांपेक्षा अधिक रकमेची बिले थकवली गेली आहेत. आज राहुल घुले यांना महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही आणि त्यांना दिल्लीला जावे लागते ही अत्यंत खेदजनक बाब आहे असे डावखरे यांनी नमूद केले. तर या साऱ्या प्रकरणाची चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल होणार का? असा सवालही डावकर यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version