महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी ठाकरे सरकारने आणलेल्या लॉकडाउनचा कडाडून विरोध केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच सरकारच्या निर्णयाचा विरोध केल्यामुळे विरोधक ठाकरे सरकारवर अधिकच आक्रमक झाले आहेत. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले…
ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे.
कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे… pic.twitter.com/4Ze7nLDmry— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 7, 2021
“ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले. ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहे. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे हे दर्शविणारे यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा
परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल
ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगून टाका
यशोमती ठाकूर यांनी ठाकरे सरकारच्या सरसकट लॉकडाउनच्या निर्णयाचा या पत्रातून विरोध केला आहे. या पत्रात यशोमती ठाकूर यांनी असं म्हटलं आहे की, अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोविडच्या केसेस झपाट्याने वाढत होत्या. या वाढत्या केसेसमुळे ३० मार्च पर्यंत अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु ३० मार्च पूर्वीचा पाचशे ते सातशे केसेसचा दर खाली येऊन दोनशे ते अडीचशे केसेसचा राहिला होता. तरीही ठाकरे सरकारने सरसकट लॉकडाऊन केला आहे. ठाकरे सरकारने अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा न घेता सरसकट लॉकडाऊन लावल्यामुळे यशोमती ठाकूर नाराज असल्याचे समजत आहे.
त्यामुळे ठाकरे सरकारने आणलेले नवे लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत असे त्यांनी या पात्रातून लिहिले आहे.