ठाकरे सरकारने महाराष्ट्राला बंदीवान केलं

ठाकरे सरकारने महाराष्ट्राला बंदीवान केलं

गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धव ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे, असा चिमटा भाजपा आमदार आशिष शेलार यांनी काढला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स सुरु आहे. मात्र, मंदिरं उघडण्याचा निर्णय अद्याप विचारात नसल्याचं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावरुन आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर जोरदार निशाणा साधलाय. सन २०१९ पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर २०२१ ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!” असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

हे ही वाचा:

भुजबळ परवेजला राहण्याचं भाडं देतात का?

जॅकलिनची ईडीकडून ५ तास चौकशी

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन २०१९ पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर २०२१ ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!”, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय.

Exit mobile version