ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एक अजब विधान केलं आहे. हाफकिनमध्ये बनवली जाणारी लस ही बदलत्या कोरोनावर उपयुक्त ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी खरपूस टीका केली आहे.  हाफकिनमध्ये तयार होणारी लस ही नवी लास नसून भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचेच उत्पादन तिथे होणार आहे, असेही भातखळकरांनी नमूद केले.

“ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची बुद्धिमता इतकी अफाट आहे की हे मंत्रिमंडळ म्हणजे खुळ्यांचा बाजार बनले आहे. अहो, डॉ.राजेंद्र शिंगणे, हाफकीनमध्ये कोणती नवीन लस बनणार नसून भारत बायोटेकने बनवलेल्या लसीची इथे फक्त निर्मिती होणार आहे. समजवा हो यांना कोणी तरी! यांना फक्त वसुलीच कळते.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी  केले आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हाफकिनमध्ये बनवली जाणारी लस सर्वोत्तम असल्याचा दावाही केला आहे. शिवाय या लसीला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले आहे. परंतु, ही लस कोणतीही नवीन लास नसून हैदराबादमधील भारत बायोटेक ही कंपनी जी कोवॅक्सीन लस बनवत आहे, त्याच लसीचे नव्याने उत्पादन हाफकिनमधून केले जाणार आहे. देशात लसींचे उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकारने अनेक नव्या उपाय योजना राबवल्या आहेत, त्यातलाच एक भाग म्हणजे मुंबईतील हाफकीनला कोवॅक्सीन लसीच्या निर्मितीची परवानगी देणे हा आहे.

हे ही वाचा:

दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते

लस उत्पादनासाठी संपूर्ण क्षमता वापरा

शिवसेना नेत्याने पुन्हा पातळी सोडली

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय

त्यामुळे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या या विधानांची सर्वच स्तरातून खिल्ली उडवली जात आहे.

Exit mobile version