भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मराठी महिन्यांच्या विषयावर उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. अतुल भातखळकर यांनी गेल्या वर्षीची (२०२०) दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि या वर्षीची (२०२१) दिनदर्शिका दाखवत हा बदल दाखवून दिला.
“महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेमधून मराठी महिने आणि तारखा गायब. ठाकरे सरकारचे हिंदुत्वही बेगडी आणि मराठी बाणाही बोगस.” अशी टीका करणारे ट्विट भातखळकरांनी केले.
महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेतून मधून मराठी महिने आणि तारखा गायब. ठाकरे सरकारचे हिंदुत्वही बेगडी आणि मराठी बाणाही बोगस…. pic.twitter.com/dD78HbpQZu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 27, 2021
“मराठी आणि हिंदू विरोधी ठाकरे सरकारने या वर्षी अजून एक मराठी विरोधी प्रताप केले आहेत. या वर्षाची महाराष्ट्र शासनाची अधिकृत दिनदर्शिका, ज्यामध्ये कायद्यानेच मराठी महिन्यांचा आणि तारखांचा उल्लेख करणं आवश्यक असतं, तो उल्लेखच गाळण्याचा पराक्रम या मराठीविरोधी ठाकरे सरकारने केलेला आहे.” असा आरोप भातखळकरांनी केला.
हे ही वाचा:
यापुढे जाऊन त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप सिद्धही केला. त्यांनी या वर्षीची म्हणजेच २०२१ ची दिनदर्शिका दाखवली, ज्यामध्ये मराठी महिन्यांचा उल्लेख कुठेही दिसला नाही आणि त्यांनी गेल्या वर्षीची म्हणजेच २०२० ची दिनदर्शिका दाखवली ज्यामध्ये मराठी महिन्यांचा उल्लेख स्पष्टपणे दिसत आहे.
“हा मराठी वरचा अन्याय आहे. ही दिनदर्शिका मागे घ्या, नव्याने दिनदर्शिका छापण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी या विरोधामध्ये आंदोलन करेल.” असेही भातखळकरांनी सांगितले.